को-रोणामुळे अनेकजण बेरोजगार झाले, हीच संधी आहे आपत्ती ला संधीमध्ये परिवर्तित करण्याची, बकरी / मेंढ्या आणि डुक्कर संगोपनावर 90% अनुदान. जाणून घ्या सविस्तर

  • by

योजना आणि त्याचा सविस्तर फॉर्म कसा भरायचा याची सविस्तर माहिती. कोरोणामुळे अनेकांच्या नोकऱ्या गेल्या.अनेकजण बेरोजगार झाले पण मित्रांनो हीच संधी आहे आपत्ती ला संधीमध्ये परिवर्तित करण्याची. काहींच्या लॉक डाऊन मुळे नोकऱ्या गेल्या तर काहींना नोकऱ्या मिळणार होत्या त्या ही राहून गेल्या. मित्रांनो तुम्ही जर बेरोजगार असाल किंवा शेतकरी असाल तर शेतीला जोडधंदा म्हणून तुम्ही दुग्ध उत्पादन, कुक्कुट पालन,शेळीपालन इत्यादी व्यवसाय करू शकता.आता तुम्हाला प्रश्न पडतील यासाठी शासकीय अनुदान आहे का?असेल तर किती आहे?त्यासाठी काय करायचे?यासाठी घेऊन आलो आहे त्यासंबंधीची माहिती. चला तर मग योजनेचा आढावा घेऊया.

बकरी / मेंढ्या आणि डुक्कर संगोपनावर 90% अनुदान २०२० च्या बजेटमध्ये देण्याचे सरकारने ठरविले आहे. केंद्र सरकार 60% खर्च देईल, तर राज्य सरकार 30% खर्चाची भरपाई करेल. याचा अर्थ असा आहे की शेतक्याला फक्त 10% खर्च सहन करावा लागेल. पशुसंवर्धन विभागाने शेळी / मेंढ्या व डुक्कर पालनसाठी. 66,000 आणि 21,000 रुपये निश्चित केले आहेत. योजनेचा लाभ घेण्यासाठी संभाव्य लाभार्थ्याने योजनेच्या अंतर्गत उघडलेल्या एकूण खर्चाच्या 10% त्यांच्या खात्यात जमा करणे आवश्यक आहे. उर्वरित रक्कम आरटीजीएस योजनेद्वारे सरकार जमा करेल. विभागाने मेंढ्या, बकरीसाठी 30-30 आणि डुक्करसाठी 50 लक्ष्याचे लक्ष्य ठेवले आहे.

खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करून pdf स्वरूपात फॉर्म डाउनलोड करा: https://timesnewstoday.com/wp-content/uploads/2020/10/bafellow-and-cow-form-scanned-copy.pdf आणि https://timesnewstoday.com/wp-content/uploads/2020/10/Goat-farming-form-scanned-copy-1.pdf लाभार्त्याने करावयाचा अर्जाचा नमुना: काय गोष्टी नमूद कराव्यात? फॉर्म मध्ये तुम्हाला रंगीत फोटो उजव्या बाजूला चिकटवावयचा आहे. त्यानंतर अर्जदाराचे नाव लिहायचे आहे.त्यांनतर तुमचा पूर्ण पत्ता(पिनकोड सह), दूरध्वनी क्रमांक,तुमचे म्हणजे अर्जदाराचे वय,लिंग इत्यादी.जर तुम्ही दारिद्र्य रेषेखाली असाल तर तशी नोंद करावी. कुटुंबातील एकूण पुरुष आणि महिला,तुमच्या मालकीची जमीन असेल तर किती आहे ती नोंद करून तिचा ७/१२ उतारा जोडावा. आणि जनावरांसाठी गोठा बांधण्यासाठी जमीन आहे का नसेल तर ज्याची जमीन आहे त्याचे संमतीपत्र जोडावे. त्यांनतर तुमच्याकडे उपलब्ध असलेल्या जनावरांची संख्या.

तुमच्याकडे शेळ्यांसाठी गोठा उपलब्ध आहे का?असल्यास किती जनावरांचा आहे?त्याचा प्रकार काय आहे? कच्च बांधकाम की पक्क बांधकाम की गवती छपराचे बांधकाम ?अर्जदाराने शेळी पालन विषयक प्रशिक्षण घेतलं आहे का ?असल्यास प्रमानपत्रची प्रत जोडावी. अर्जदार अनुसूचित जाती किंवा अनुसूचित जमाती मधील आहे का?अर्जदार बचत गटाचा सदस्य आहे का?असल्यास नाव व पत्ता?अर्जदार सुशिक्षित बेरोजगार आहे का?माहिती खरी असल्याची समंती.कर्जासाठी बँकेचे नाव व शाखा. आधार कार्ड नंबर,मोबाईल नंबर,सही ही सर्व माहिती भरावी लागणार.

काय कागदपत्र लागतील? १) फोटो ओळख पत्राची सत्यप्रत २) दारिद्र्य रेषेखाली असल्यास दाखला ३) सातबारा व ८-अ उतारा आणि ग्रामपंचायत नमुना नं ८ ४) प्रशिक्षण घेतले असल्यास प्रमाणपत्राची छ्यांकित प्रत ५) जातीच्या दाखल्याची प्रत ६) बचत गट सदस्य असल्यास प्रमाणपत्र ७) रोजगार – स्वयंरोजगार कार्यालयाचे नाव नोंदणी कार्डाची सत्यप्रत ८) अपत्य प्रमाणपत्र ९) बँक खात्याची झेरॉक्स प्रत १०) आधार कार्डची झेरॉक्स प्रत.

११) रेशन कार्डची सुस्पष्ट साक्षांकित छ्यांकीत प्रत त्यांनतर संमती पत्र संमती पत्र लिहून घेणारे आणि लिहून देणारे या दोघांची माहिती भरावयाची आहे. मग त्यात त्यांचं नाव,पत्ता व गावाचे नाव त्या ठिकाणी टाकायचे आहे. आणि शेवटी संमती पत्र लिहून देनाऱ्याची तुम्हाला सही घ्यायची आहे. त्यांनतर जर तुम्ही बचत गटाचे सदस्य आहात तर तुम्हाला त्याची माहिती भरायची आहे.आणि शेवटी त्या बचत गटाच्या सचिव आणि अध्यक्षांची सही आणि शिक्का तुम्हाला घ्यावा लागणार आहे.

रहिवासी स्वयंघोषना पत्र: यात उजव्या बाजूला तुम्हाला फोटो,तुमच्या परिवाराची माहिती, आधार कार्ड नंबर आणि मोबाईल नंबर इत्यादी माहिती द्यायची आहे.आणि शेवटी तुमची सही आणि तारीख टाकायची आहे. महाराष्ट्र नागरी सेवा(लहान कुटुंबाचे प्रमाणपत्र) नियम २००१ मधील प्रतिज्ञा पत्राचा नमुना अ-(नियम-४ पहा) यानुसार तुम्ही असे जाहीर करता की तुम्ही या पदाचा अर्ज केला आहे. तुम्हाला एकूण किती मुले आहेत आणि २००१ नंतर मुल जर जन्माला आली असतील तर त्यांची नावे टाकायची आहे. त्यांनतर हयात असलेल्या मुलांची संख्या भरायची आहे.शेवटी स्वाक्षरी करायची आहे.

संस्थाप्रमुख पशुवैद्यकीय दवाखाना यांचे प्रमाण पत्र: यामध्ये पडताळणी करून दिलेली माहिती बरोबर असल्याची ग्वाही संस्था प्रमुखांच्या सहिने करावी. पशुधन विकास अधिकारी यांचे शिफारस पत्र: यामध्ये अर्जदाराचे नाव आणि पत्ता असतो व अर्जदाराने दिलेल्या माहितीची प्र्यतक्ष छाननी केली असल्याचे पशुधन विकास अधिकारी यांच्या सहीने सिद्ध होते.बाकी फॉर सुद्धा अश्याच प्रकारचे आहे त्यात फक्त थोडेसे बदल करण्यात आले आहे. अश्यारितीने हा फॉर्म प्रिंट काढून व्यवस्थित भरून जिल्ह्याच्या पशू वैद्यकीय कार्यालयात भरा. आणि एका नव्या जिद्दीने व्यवसायात उतरा. अधिक माहितीसाठी खाली दिलेल्या लिंक वर क्लिक करा https://ahd.maharashtra.gov.in/state-scheme.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *